Yash Movie Title : केजीएफच्या यशानंतर यशचे चाहत्यांना सरप्राइज; नव्या चित्रपटाची केली घोषणा

यशचा 'टॉस्किक' हा चित्रपट 10 एप्रिल 2025 रोजी चित्रपटगृहात येणार आहे.
Yash Movie Title : केजीएफच्या यशानंतर यशचे चाहत्यांना सरप्राइज; नव्या चित्रपटाची केली घोषणा

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार अभिनेता यशच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षकवर्ग उत्सुकतेने वाट बघत असतो.'KGF 1' आणि 'KGF2' या चित्रपटांच्या यशानंतर यशचे चाहते त्याच्या नव्या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत. अशातच आता यशने त्याच्या चाहत्यांना सरप्राइज देत त्याच्याआगामी चित्रपटाची घोषणा केली आहे.

यशच्या आगामी चित्रपटाचे नाव 'टॉक्सिक' असे आहे. यशने एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करुन त्याच्या आगामी चित्रपटाच्या नावाची घोषणा केली आहे. तसेच या व्हिडीओमध्ये चित्रपटाच्या रिलीज डेटचा देखील उल्लेख करण्यात आला आहे. यशने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओत अर्धे जळालेले पत्ते दिसत आहेत. व्हिडीओच्या बॅकग्राऊंडला एक आकर्षक गाणं ऐकू येत आहे.

यशच्या दमदार लूकची झलक देखील या व्हिडीओत बघायला मिळत आहे. व्हिडीओमध्ये यश हा काउबॉय लूकमध्ये दिसत आहे. तो सिगार ओढताना दिसत आहे. त्याच्या एका हातात मोठी बंदूकही दिसत आहे. यशचा 'टॉस्किक' हा चित्रपट 10 एप्रिल 2025 रोजी चित्रपटगृहात येणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन गीतू मोहनदास यांनी केले आहे. तसेच या चित्रपटाची निर्मिती 'केव्हीएन प्रॉडक्शन हाऊस'ने केली आहे. प्रेक्षकवर्ग फार आतुरतेने या चित्रपटाची वाट पाहत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in