'योगयोगेश्वर जयशंकर' मालिकेला मिळाला 'सर्वोत्कृष्ट शीर्षक गीता'चा पुरस्कार

'बीग मराठी एंटरटेनमेंट' पुरस्कार सोहळ्यात संगीतकार 'कुणाल - करण'ने संगीतबद्ध केलेल्या 'योगयोगेश्वर जयशंकर' मालिकेला मिळाला 'सर्वोत्कृष्ट शीर्षक गीता'चा पुरस्कार
'योगयोगेश्वर जयशंकर' मालिकेला मिळाला 'सर्वोत्कृष्ट शीर्षक गीता'चा पुरस्कार

अनेक लोकप्रिय मालिकांचे शीर्षक गीत आणि ट्रेंडींग गाण्यांना संगीत देणारी मराठमोळी जोडी म्हणजे कुणाल भगत आणि करण सावंत. 'बीग मराठी एंटरटेनमेंट' पुरस्कार सोहळ्यात संगीतकार कुणाल - करण यांना 'योगयोगेश्वर जयशंकर' मालिकेसाठी 'सर्वोत्कृष्ट शीर्षक गीत' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आत्तापर्यंत त्यांनी 'महामिनिस्टर', 'किचन कल्लाकार', 'बस बाई बस', 'नवा गडी नवं राज्य', 'बॅंड बाजा वरात', 'अगं अगं सूनबाई काय म्हणता सासूबाई?' अश्या तब्बल १४ मालिकांच्या शीर्षक गीतांना संगीतबद्ध केलेले आहे.

या मालिकेचे शीर्षक गीत गायिलेली गायिका सोनाली सोनावणे सांगते, “बीग मराठी एंटरटेनमेंट' पुरस्कार सोहळ्यात 'संगीतकार कुणाल - करण' यांना 'योगयोगेश्वर जयशंकर' मालिकेसाठी 'सर्वोत्कृष्ट शीर्षक गीता'चा पुरस्कार मिळाला त्यासाठी त्यांचे मनापासून अभिनंदन. मी याआधी त्यांच्यासोबत अनेक मालिकांचे शीर्षक गीत आणि ब-याच अल्बम गाण्यांसाठी काम केले आहे. कुणाल करण सोबत काम करताना नेहमीच काहीतरी नविन गोष्टी शिकायला मिळतात. योगयोगेश्वर जयशंकर हे शीर्षक गीत माझ्यासाठी फार स्पेशल आहे.”

संगीतकार कुणाल - करण त्यांना मिळालेल्या पुरस्काराविषयी सांगतात, “आज पर्यंत आम्ही १४ मालिकेचं शीर्षक गीत केले आहे आणि त्यात 'योगयोगेश्वर जयशंकर' या मालिकेला पुरस्कार मिळाला याचा खूप आनंद होत आहे. कारण हे शीर्षक गीत इतकं लोकप्रिय आहे की लोकांच्या प्रतिक्रिया नेहमी येत असतात की हे गाणं खूप मनाला भावणार आहे, रोज आम्ही ऐकतो, भक्तीत तल्लीन करणार आहे, लोकांच्या या प्रेमामुळेच आज या शीर्षक गीताला सगळ्यात जास्त वोट्स मिळून ‘बिग मराठी एंटरटेनमेंट’ पुरस्कार मिळाला. ही पोच पावती आमच्यासाठी संगीतकार, गीतकार म्हणून खूप मोलाची आहे.”

पुढे ते सांगतात, “खर तर हा पुरस्कार आपल्या सगळ्यांचा आहे. तुम्ही हे गाणं आपलंसं करून घेणं आणि त्यावर इतकं प्रेम करण यापेक्षा जास्त काय महत्वाचं असेल एका कलाकाराला. कर्लस मराठी, झंकार फिल्मस्, निर्माते संजय शंकर सर, सहनिर्माते चिन्मय उदगीरकर, गायक रविंद्र खोमणे आणि गायिका सोनाली सोनावणे यांचे आम्ही मनापासून आभार मानतो, तसेच सर्व प्रेक्षकांचे मनापासून आभार, कुणाल - करण वर असच प्रेम असुद्या, आणि आम्ही अशीच नवनवीन गाणी तुमच्यासाठी घेऊन येण्याचा प्रयत्न करू.”

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in