'झिम्मा 2' चा ट्रेलर झाला रिलिज ;बाई होणं म्हणजे फक्त आई होणं नाही... हसत हसत डोळ्यात पाणी आणेल.

या चित्रपटाच्या टीझरने आणि 'मराठी पोरी' हे गाणं सोशल मीडियावर चांगलेच वायरल झालं आहे.
'झिम्मा 2' चा ट्रेलर झाला रिलिज ;बाई होणं म्हणजे फक्त आई होणं नाही... हसत हसत डोळ्यात पाणी आणेल.

मराठी मनोरंजनविश्वात एका मागोमाग एक चित्रपट येतंच आहेत. पण मागील अनेक दिवसांपासून एका खास चित्रपटाची सर्वत्र चर्चा आहे. तो म्हणजे 'झिम्मा 2'.या चित्रपटाच्या टीझरने आणि 'मराठी पोरी' हे गाणं सोशल मीडियावर चांगलेच वायरल झालं आहे.

नुकतंच 'झिम्मा 2' या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. चित्रपटाचा हा ट्रेलर हसवता हसवता डोळ्यात पाणी देखील आणतो. बाई होणं म्हणजे फक्त आई होणं नाही. शेवटचा श्वास आहे तोपर्यंत जगून घ्यायचं, या वाक्याने ट्रेलर आपल्याला पूर्णतः हळवं करून टाकतो. हा चित्रपट हसवता हसवता डोळ्यात पाणी आणायला भाग पडेल असा आहे.

'झिम्मा २' हा चित्रपट कलर येल्लो प्रॉडक्शन्सच्या सहकार्याने जिओ स्टुडिओज प्रस्तुत आहे. चलचित्र मंडळी निर्मित, ज्योती देशपांडे, आनंद एल राय आणि क्षिती जोग निर्मीत, हेमंत ढोमे दिग्दर्शित तसेच सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकू राजगुरू, शिवानी सुर्वे आणि सिद्धार्थ चांदेकर या कलाकारांच्या दमदार भूमिका या चित्रपटांत आहेत. 'झिम्मा २' हा चित्रपट २४ नोव्हेंबरला सर्व चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in