हज यात्रेत १ हजार जणांचा मृत्यू; शेकडो लोकांवर उपचार सुरू

सौदी अरेबियाच्या मक्का येथे हज यात्रेला केलेल्या एक हजार भाविकांचा उष्णतेच्या लाटेत मृत्यू झाला आहे. यात ७० भारतीयांचा समावेश आहे.
हज यात्रेत १ हजार जणांचा मृत्यू; शेकडो लोकांवर उपचार सुरू

रियाध : सौदी अरेबियाच्या मक्का येथे हज यात्रेला केलेल्या एक हजार भाविकांचा उष्णतेच्या लाटेत मृत्यू झाला आहे. यात ७० भारतीयांचा समावेश आहे. तसेच हजारो जण अत्यवस्थ असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

एका अरबी राजदूताने सांगितले की, मृतांमध्ये ६५८ भाविक इजिप्तचे असून १४०० जण बेपत्ता आहेत. सौदीने अजूनही नेमके किती भाविक मृत झाले आहेत, याची अधिकृत आकडेवारी जाहीर केली नाही.

पश्चिम आशियात यंदा भीषण उष्णतेची लाट आली आहे. १७ जूनला मक्केत ५१.८ अंश तापमान नोंदवले गेले.

१२ ते १९ जून दरम्यान ७० भारतीयांचा मृत्यू

हजमध्ये १२ ते १९ जून दरम्यान ७० भारतीयांचा मृत्यू झाला आहे. हज कमिटी ऑफ इंडियाच्या माहितीनुसार, यंदा भारतातून १ लाख ७५ हजार भाविक हज यात्रेला गेले आहेत. केरळचे हज मंत्री अब्दुल रेहमान यांनी केंद्र सरकारला भारतीयांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे आवाहन केले. भारतीयांना जेद्दा पोहचल्यावर मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. तसेच त्यांच्या राहण्याची व्यवस्थाही चांगली नव्हती.

logo
marathi.freepressjournal.in