नायजेरियात १०० जणांची गोळ्या घालून हत्या

नायजेरियातील उत्तर-मध्य बेन्यू राज्यातील येलेवाटा शहरातील एका गावात किमान १०० जणांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली असून शेकडो जण जखमी झाले आहेत. तसेच डझनभर लोक अजूनही बेपत्ता आहेत. मानवाधिकार गट ‘ॲम्नेस्टी इंटरनॅशनल नायजेरिया’ने फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, शुक्रवारी रात्री उशिरा ते शनिवारी सकाळपर्यंत हे हल्ले झाले.
नायजेरियात १०० जणांची गोळ्या घालून हत्या
Photo - Amnesty International
Published on

अबुजा : नायजेरियातील उत्तर-मध्य बेन्यू राज्यातील येलेवाटा शहरातील एका गावात किमान १०० जणांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली असून शेकडो जण जखमी झाले आहेत. तसेच डझनभर लोक अजूनही बेपत्ता आहेत. मानवाधिकार गट ‘ॲम्नेस्टी इंटरनॅशनल नायजेरिया’ने फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, शुक्रवारी रात्री उशिरा ते शनिवारी सकाळपर्यंत हे हल्ले झाले.

जखमींना अद्याप आवश्यक वैद्यकीय सेवा मिळू शकलेली नाही. या सामूहिक हल्ल्यात हल्लेखोरांनी गावातील अनेक कुटुंबांना त्यांच्या घरात कोंडून ठेवले व जिवंत जाळले. लोक इतके वाईट रीतीने जाळले गेले की त्यांची ओळख पटवणे कठीण झाले आहे. बेन्यू हे नायजेरियाच्या मध्यवर्ती भागात आहे, जिथे उत्तरेला मुस्लिमबहुल आणि दक्षिणेला ख्रिश्चनबहुल आहे. दोन्ही समुदायांमध्ये अनेकदा जमीन आणि पाण्यावरून भांडणे होतात.

logo
marathi.freepressjournal.in