पाकिस्तानात ११ दहशतवाद्यांना अटक

लाहोरपासून ४०० किलोमीटर अंतरावर असलेल्या पंजाबच्या बहावलपूर जिल्ह्यातून त्याला पकडण्यात आले.
पाकिस्तानात ११ दहशतवाद्यांना अटक

लाहोर : इसिस, अल-कायदा आणि टीटीपीच्या तब्बल ११ संशयित दहशतवाद्यांना पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील वेगवेगळ्या भागातून अटक करण्यात आली असल्याचे पोलिसांनी शनिवारी सांगितले. तसेच त्यांनी दावा केला की त्यांनी मोठा दहशतवादी कट हाणून पाडला आहे.

दहशतवाद्यांमध्ये तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तानचा प्रमुख कमांडर मुहम्मद एजाजचा समावेश आहे, ज्याने अफगाणिस्तानमध्ये दहशतवादाचे प्रशिक्षण घेतले होते. लाहोरपासून ४०० किलोमीटर अंतरावर असलेल्या पंजाबच्या बहावलपूर जिल्ह्यातून त्याला पकडण्यात आले. पंजाब पोलिसांच्या काउंटर टेररिझम डिपार्टमेंटने सांगितले की, दहशतवाद्यांनी महत्त्वाच्या ठिकाणांना लक्ष्य करून संपूर्ण प्रांतात तोडफोड करण्याची योजना आखली होती. एका निवेदनात त्यांनी म्हटले आहे की पंजाब पोलिसांनी या ११ संशयित दहशतवाद्यांना अटक करून एक मोठा दहशतवादी कट हाणून पाडला आहे.

logo
marathi.freepressjournal.in