ग्रीसजवळ मालवाहू जहाज बुडून १३ कर्मचारी बेपत्ता - ४ भारतीय कर्मचाऱ्यांचा समावेश

कोमोरोसमध्ये नोंदणीकृत रॅप्टर हे जहाज ६००० टन मीठ घेऊन इजिप्तमधील अलेक्झांड्रिया येथून इस्तंबूलला जात होते.
ग्रीसजवळ मालवाहू जहाज बुडून १३ कर्मचारी बेपत्ता - ४ भारतीय कर्मचाऱ्यांचा समावेश

अथेन्स : ग्रीसच्या लेसबॉस बेटाजवळ रविवारी पहाटे वादळी समुद्रात मालवाहू जहाज बुडून चार भारतीयांसह १३ कर्मचारी बेपत्ता झाले. एका कर्मचाऱ्याची सुटका करण्यात बचावदलांना यश आले आहे. अन्य कर्मचाऱ्यांचा शोध सुरू आहे.

कोमोरोसमध्ये नोंदणीकृत रॅप्टर हे जहाज ६००० टन मीठ घेऊन इजिप्तमधील अलेक्झांड्रिया येथून इस्तंबूलला जात होते. त्यात आठ इजिप्शियन, चार भारतीय आणि दोन सीरियन नागरिकांसह १४ कर्मचारी होते. रविवारी सकाळी ७ वाजता जहाजाने यांत्रिक समस्या नोंदवली आणि बचावासाठी संदेश पाठवला. त्यानंतर आठ व्यापारी जहाजे, दोन हेलिकॉप्टर आणि ग्रीक नौदलाची एक फ्रिगेट वाचलेल्यांचा शोध घेत आहेत. खराब हवामानामुळे तीन तटरक्षक जहाजांना या भागात पोहोचण्यात अडचण येत होती. एका इजिप्शियन कर्मचाऱ्याची सुटका करण्यात आली.

logo
marathi.freepressjournal.in