कोलंबियात खासगी विमान कोसळून १५ जण ठार

या विमानात १३ प्रवासी आणि दोन क्रू मेंबर्स होते आणि त्यामध्ये कोलंबियाच्या संसदेचे सदस्य (चेंबर ऑफ डेप्युटीज) आणि आगामी निवडणुकीतील एका उमेदवाराचा समावेश आहे.
कोलंबियात खासगी विमान कोसळून १५ जण ठार
(Photo-X)
Published on

बोगोटा : कोलंबियामध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एक विमान कोसळले असून त्यामध्ये त्यांचा अंत झाला आहे. या विमानात १३ प्रवासी आणि दोन क्रू मेंबर्स होते आणि त्यामध्ये कोलंबियाच्या संसदेचे सदस्य (चेंबर ऑफ डेप्युटीज) आणि आगामी निवडणुकीतील एका उमेदवाराचा समावेश आहे.

बीचक्राफ्ट १९०० हे व्यवसायिक विमान बुधवारी सकाळी ११:४२ वाजता कुकुटा येथून १५ जणांना घेऊन आकाशात झेपावले. परंतु लँडिंगच्या अवघ्या ११ मिनिटांपूर्वी या विमानाचा संपर्क तुटला. विमानाचा शेवटचा रडार संपर्क कॅटाटुम्बो परिसरात नोंदवण्यात आला होता.

त्यानंतर शोध मोहीम सुरू करण्यात आली. विमानाचे अवशेष कॅटाटुम्बोच्या दुर्गम आणि डोंगराळ भागात आढळले. हा परिसर खराब हवामान आणि खडकाळ टेकड्यांसाठी ओळखला जातो, ज्यामुळे शोध मोहिमेत मोठे आव्हान निर्माण झाले.

logo
marathi.freepressjournal.in