श्रीलंकेत अतिवृष्टीमुळे १५ जणांचा मृत्यू

श्रीलंकेत मान्सून दाखल झाल्यानंतर झालेल्या पावसाने मोठ्या प्रमाणावर किमान १५ लोक ठार झाले आणि ५००० हून अधिक कुटुंबांतील १९,००० हून अधिक पुराच्या पाण्याने वेढले गेले आहेत, असे अधिकाऱ्यांनी रविवारी सांगितले.
15 people died due to heavy rain in Sri Lanka
@colombogazette/ X

कोलंबो : श्रीलंकेत मान्सून दाखल झाल्यानंतर झालेल्या पावसाने मोठ्या प्रमाणावर किमान १५ लोक ठार झाले आणि ५००० हून अधिक कुटुंबांतील १९,००० हून अधिक पुराच्या पाण्याने वेढले गेले आहेत, असे अधिकाऱ्यांनी रविवारी सांगितले.

राजधानी कोलंबोसह सात जिल्ह्यांमधून मृत्यूची नोंद झाली आहे. तेथे ३०० मिमी पेक्षा जास्त मुसळधार पावसामुळे अचानक पूर आला. झाडे उन्मळून पडली. जोरदार वारा वाहत असून आणि वीजपुरवठा खंडित झाला आहे. काही ठिकाणी भूस्खलन झाले आहे. २५ पैकी २० प्रशासकीय जिल्ह्यांना पावसाचा मोठा फटका बसला आहे. ४००० हून अधिक घरांचे अंशत: नुकसान झाले असून, २८ घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत.

श्रीलंकेच्या लष्कराने बचाव कार्यासाठी नौकांसह सुसज्ज सात पथके तयार केली आहेत. बाधित भागात तात्काळ आपत्कालीन प्रतिसादासाठी हवाई दलाने तीन हेलिकॉप्टर सज्ज ठेवलीआहेत. आणखी पाऊस आणि पूर येण्याची शक्यता गृहित धरून शिक्षण मंत्रालयाने सोमवारी संपूर्ण देशातील सर्व शाळा बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून, ऊर्जा मंत्रालयाने अनेक भागांचा वीज पुरवठा बंद केला आहे. नॅशनल बिल्डिंग रिसर्च सेंटरने चार जिल्ह्यांसाठी भूस्खलनासाठी रेड नोटीस जारी केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in