Dallas aircraft crash: अमेरिकेत एअर शो दरम्यान दोन विमानांची धडक; सोशल मीडियावर व्हिडीयो वायरल

फेडरल एव्हिएशन अ‌ॅडमिनिस्ट्रेशन (FAA) अपघाताची चौकशी करणार असून दोषींवर कडक करणार असल्याची दिली ग्वाही
Dallas aircraft crash: अमेरिकेत एअर शो दरम्यान दोन विमानांची धडक; सोशल मीडियावर व्हिडीयो वायरल

अमेरिकेतील एका एअर शो (Dallas aircraft crash) दरम्यान दुसऱ्या महायुद्धातील दोन विमानांची जोरदार धडक झाली. हा भीषण अपघात डलास येथे घडला. या अपघातात ६ जणांचा दुर्दैवी अंत झाला असल्याची माहिती हवाई दलाने दिली आहे. या घटनेचा व्हिडियो सोशल मीडियावर चांगलाच वायरल झाला आहे.

फेडरल एव्हिएशन अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (FAA) ने दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात दुसऱ्या महायुद्धात वापरले गेलेले विमान कोसळले आहेत. यापैकी एक बोईंग बी-१७ फ्लाइंग फोर्ट्रेस आहे. तर दुसरे बेल पी-६३ किंगकोब्रा या विमानाचा समावेश आहे. टेक्सास राज्यातील डॅलास येथे विमानतळावर हा एअर शो आयोजित करण्यात आला होता. विमान जमिनीवर पडताच त्याला आग लागली. आमची तपास संस्था आणि राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा मंडळ या अपघाताची चौकशी करणार आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in