पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ल्यात २ पोलीस ठार

गोळीबारात दोन पोलीस ठार, तर तीन जखमी झाले. जखमींना नजिकच्या संयुक्त लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले
पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ल्यात २ पोलीस ठार

पेशावर : पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील एका तेल आणि वायू कंपनीवर मंगळवारी रात्री सशस्त्र दहशतवाद्यांनी हल्ला केला. त्यात दोन पोलीस ठार झाले आणि तीन जण जखमी झाले.

दक्षिण वझिरीस्तान प्रांताच्या सीमेला लागून असलेल्या डेरा इस्माईल खान भागातील अलहाज ऑइल अँड गॅस कंपनीवर मंगळवारी रात्री उशिरा हा हल्ला झाला. या गोळीबारात दोन पोलीस ठार, तर तीन जखमी झाले. जखमींना नजिकच्या संयुक्त लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले. हल्ल्यानंतर अतिरिक्त पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी पोहोचला आणि पळून गेलेल्या हल्लेखोरांना पकडण्यासाठी परिसरात शोधमोहीम सुरू करण्यात आली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in