पेशावर : दहशतवाद्यांनी मंगळवारी वायव्य पाकिस्तानमध्ये निमलष्करी दलाच्या फ्रंटियर कोअरच्या तुकडीवर केलेल्या हल्ल्यात दोन सैनिक ठार झाले.
दहशतवाद्यांनी खैबर पख्तुनख्वा प्रांतातील तिराह व्हॅली जिल्ह्यातील अप्पर बारा भागातील पर्वतांवरून फ्रंटियर कोअरच्या बॉम्ब डिस्पोजल युनिटवर गोळीबार केला. या गोळीबारात दोन सैनिक जखमी झाले आणि नंतर रुग्णालयात त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर सैन्याने संपूर्ण परिसराची नाकाबंदी केली आणि पळून गेलेल्या गुन्हेगारांना पकडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम सुरू केली. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
गेल्या काही दिवसांत दहशतवाद्यांनी पाकिस्तानातील सुरक्षा आणि लष्करी प्रतिष्ठानांवर वारंवार हल्ले केले आहेत. १२ डिसेंबर रोजी तेहरिक-ए-जिहाद पाकिस्तान या तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तानशी संलग्न असलेल्या गटाच्या अतिरेक्यांच्या हल्ल्यात किमान २३ सैनिक ठार झाले आणि ३० हून अधिक जखमी झाले होते.