मुस्लिम कार्ड देखील नाही चाललं! तहव्वुर राणाला अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाचा दणका, प्रत्यार्पणाला स्थगिती देण्यास नकार

अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने २००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ला प्रकरणाचा आरोपी तहव्वूर राणाला शुक्रवारी चांगलाच झटका दिला. भारतातील प्रत्यार्पणाला स्थगिती देण्याची त्याची याचिका कोर्टाने फेटाळली.
मुस्लिम कार्ड देखील नाही चाललं! तहव्वुर राणाला अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाचा दणका, प्रत्यार्पणाला स्थगिती देण्यास नकार
एएनआय/संग्रहित छायाचित्र
Published on

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने २००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ला प्रकरणाचा आरोपी तहव्वूर राणाला शुक्रवारी चांगलाच झटका दिला. भारतातील प्रत्यार्पणाला स्थगिती देण्याची त्याची याचिका कोर्टाने फेटाळली.

राणाने अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात अर्ज करून त्याच्या पूर्वी मंजूर झालेल्या प्रत्यार्पणाच्या आदेशावर तातडीने स्थगिती देण्याची विनंती केली होती.

मी पाकिस्तानी वंशाचा मुस्लिम

तो पाकिस्तानी वंशाचा मुस्लिम असल्यामुळे भारतात त्याच्यावर अमानुष छळ होईल, असा दावा त्याने आपल्या याचिकेत केला होता. तसेच, भारतामध्ये न्यायालयीन खटल्याला सामोरा जाण्यासाठी त्याच्या जगण्याच्या संधी अत्यल्प असतील. जर स्थगिती देण्यात आली नाही, तर या प्रकरणाचे कोणतेही पुनरावलोकन होणार नाही आणि अमेरिकेतील न्यायालये या प्रकरणावर अधिकार गमावतील व याचिकाकर्त्याचा लवकरच मृत्यू होईल, अशी अनेक कारणं राणाच्या वतीने देण्यात आली होती. राणाने त्याच्या गंभीर आजारांसह अनेक घटकांचा उल्लेख केला होता. पण सुप्रीम कोर्टाने त्याची याचिका अखेर फेटाळून लावली.

राणा हा पाकिस्तानी वंशाचा कॅनेडियन नागरिक आहे. सध्या तो लॉस एंजेलिसमधील मेट्रोपॉलिटन डिटेन्शन सेंटरमध्ये कैद आहे. मुंबई हल्ल्याच्या प्रमुख कटकारस्थानकर्त्यांपैकी एक, पाकिस्तानी-अमेरिकन दहशतवादी डेव्हिड कोलमन हेडली याला मदत केल्याचा त्याच्यावर आरोप आहे.

दरम्यान, अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचा दौरा केला, या दौऱ्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राणाच्या प्रत्यार्पणास हिरवा कंदिल दाखवला होता.

logo
marathi.freepressjournal.in