नवाल्नी यांना श्रद्धांजली वाहणारे २७३ जण ताब्यात

नवाल्नी यांच्या मृत्यूनंतर रशियातील ३२ शहरांत त्यांच्यासाठी आदरांजली वाहण्यासाठीचे कार्यक्रम उत्स्फूर्तपणे आयोजित करण्यात आले होते.
नवाल्नी यांना श्रद्धांजली वाहणारे २७३ जण ताब्यात

मॉस्को : रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे प्रमुख विरोधक अलेक्सी नवाल्नी यांच्या तुरुंगातील मृत्यूनंतर त्यांना आदरांजली वाहण्यासाठी जमलेल्या किमान २७३ नागरिकांना शनिवारी रशियात पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यात सेंट पीटर्सबर्ग शहरातील १०९ जणांचा आणि मॉस्कोतील ३९ जणांचा समावेश आहे. नवाल्नी यांच्या मृत्यूनंतर रशियातील ३२ शहरांत त्यांच्यासाठी आदरांजली वाहण्यासाठीचे कार्यक्रम उत्स्फूर्तपणे आयोजित करण्यात आले होते. दरम्यान, नवाल्नी यांच्या समर्थकांनी त्यांच्या तुरुंगातील मृत्यूच्या वृत्ताची खातरजमा केली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in