इजिप्तमधील अपघातात ३२ ठार

जखमींना वादी अल-नत्रुन येथील रुग्णालयात हलविण्यात आले, तर इतरांना अल-नुबारिया येथे नेण्यात आले.
इजिप्तमधील अपघातात ३२ ठार

कैरो : इजिप्तमध्ये अनेक वाहनांचा एकाच वेळी अपघात होऊन किमान ३२ लोक ठार आणि ६३ जखमी झाले आहेत, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. राजधानी कैरोच्या उत्तरेस १३१ किमी अंतरावर असलेल्या कैरो-अलेक्झांड्रिया रस्त्यावर इजिप्तच्या बेहेरा गव्हर्नरेटमध्ये शनिवारी सकाळी ही टक्कर झाली.

त्यात किमान ६३ लोक जखमी झाले आहेत, असे आरोग्य मंत्रालयाने सांगितले. सरकारी वृत्तपत्र अल-अहरामने सांगितले की, अपघातात एक प्रवासी बस आणि अनेक कारचा समावेश होता, ज्यापैकी काहींना आग लागली. अनेकांचा होरपळून मृत्यू झाला आहे. अपघाताच्या ठिकाणी किमान २० रुग्णवाहिका पाठवण्यात आल्याचे आरोग्य मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे. आरोग्य मंत्री डॉ खालेद अब्देल गफार यांनी सांगितले की, जखमींना वादी अल-नत्रुन येथील रुग्णालयात हलविण्यात आले, तर इतरांना अल-नुबारिया येथे नेण्यात आले.

logo
marathi.freepressjournal.in