कझाकस्तानमधील खाण दुर्घटनेत ३२ जणांचा मृत्यू

कझाकस्तानमधील आर्सेलर मित्तल संचालित साइटवर गेल्या दोन महिन्यांतील ही दुसरी जीवघेणी घटना आहे.
कझाकस्तानमधील खाण दुर्घटनेत ३२ जणांचा मृत्यू
Published on

अस्ताना : कझाकस्तानमध्ये कोस्टेन्को येथे आर्सेलर मित्तल स्टील कंपनीच्या मालकीच्या खाणीला लागलेल्या आगीत किमान ३२ जणांचा मृत्यू झाला आहे.
खाणीत काम करणाऱ्या २५२ लोकांपैकी आणखी १४ जण बेपत्ता आहेत. आतापर्यंत १८ जणांवर वैद्यकीय उपचार करण्यात आले आहेत.

कंपनीच्या कझाकस्तानमधील खाण कामकाजाचे राष्ट्रीयीकरण करण्याचा करार झाल्याच्या दिवशीच ही आग लागली आहे. कझाकस्तानचे अध्यक्ष कासिम-जोमार्ट तोकायेव यांनी आग लागण्यापूर्वी कंपनीमधील गुंतवणूक थांबवण्याचे आदेश दिले होते. त्यांनी राष्ट्रीयीकरणासाठी दबाव आणला होता. आर्सेलर मित्तल तेमिरताऊ यांच्याकडे कझाकस्तानमध्ये १५ कोळसा आणि धातूच्या खाणी आहेत.

कझाकस्तानमधील आर्सेलर मित्तल संचालित साइटवर गेल्या दोन महिन्यांतील ही दुसरी जीवघेणी घटना आहे. ऑगस्टमध्ये कारागंडा खाणीला आग लागून चार खाण कामगारांचा मृत्यू झाला होता. नोव्हेंबर २०२२ मध्ये त्याच भागातील एका खाणीतून मिथेन वायू गळतीमुळे पाच लोकांचा मृत्यू झाला आणि इतर चार जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

logo
marathi.freepressjournal.in