ब्राझीलची 33 वर्षीय फिटनेस इन्फ्लुएन्सरचं हृदय विकाराच्या झटक्याने निधन ; दुसऱ्यांदा झटका आल्याने गमावले प्राण

मिळालेल्या माहितीनुसार तिच्या शरिरात ड्रग्स आणि मद्य गेल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
ब्राझीलची 33 वर्षीय फिटनेस इन्फ्लुएन्सरचं हृदय विकाराच्या झटक्याने निधन ; दुसऱ्यांदा झटका आल्याने गमावले प्राण

ब्राझीलची तरूण फिटनेस इन्फ्लुएन्सर लारिसा बोर्जचे अवघ्या 33 व्या वर्षी दोनदा हार्ट अटॅक आल्यामुळे निधन झालं आहे. लारिसावर आठवड्याभरापासून न्यूयॉर्कच्या रूग्णालयात उपचार सुरू होता. तिच्या कुटुंबियांनी तिच्या इन्स्टाग्राम पेजवरून तिच्या निधनाची माहिती सगळयांना दिली. "केवळ 33व्या वर्षी कोणाला तरी गमावणं हे अतिशय वेदनादायी असते. ही ह्रदयद्रावक घटना आहे" ,अशा भावना लारिसाच्या कुटुंबीयांनी व्यक्त केल्या.

स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार फिटनेस इन्फ्लुएन्सर बॉर्जेस ग्रामाडो येथे जात असताना तिला 20 ऑगस्ट रोजी पहिला हार्ट अटॅक आला होता. यानंतर तिला ताबडतोब रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर ती कोमामध्ये गेली होती. लारिसाला दुसरा हार्ट अटॅक आल्यानंतर मात्र तिला आपले प्राण गमवावे लागले. बॉर्जेसचा हार्ट अटॅक आला असला तरी तिच्या मृत्यूचे मुळ कारण अद्याप समजलं नाही. मात्र, प्राथमिक तपासात ज्यावेळी तिला हार्ट अटॅक आला त्यावेळी ती नशेत असल्याचं सांगितलं जात आहे. लारिसाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

गुस्टावो बार्सेलोसमधील डेप्युटींनी या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असल्याचे सांगितलं. ते म्हणाले की, "मिळालेल्या माहितीनुसार तिच्या शरिरात ड्रग्स गेल्याची शक्यता आहे. याच्या जोडीला मद्य देखील शरिरात गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तिचा मृतदेह पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आला असून तिने कोणत्या गोष्टीचे सेवन केलं होत हे आम्ही प्रयोगशाळेतील तपासातून लवकरच शोधून काढू", असं त्यांनी सांगितलं.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in