जर्मनीत हिजबुल्लाच्या समर्थक केंद्रांवर ५४ ठिकाणी छापे

इस्लामिक सेंटर हॅम्बुर्ग किंवा आयझेडएच ही संघटना जर्मनीच्या देशांतर्गत गुप्तचर संस्थेच्या निरीक्षणाखाली आहे
जर्मनीत हिजबुल्लाच्या समर्थक केंद्रांवर ५४ ठिकाणी छापे

बर्लिन : इराणी विचारसरणीचा प्रचार आणि हिजबुल्लाच्या कारवायांचे समर्थन केल्याचा संशय असलेल्या हॅम्बर्गस्थित केंद्राच्या तपासणीत जर्मन पोलिसांनी गुरुवारी देशभरातील ५४ ठिकाणी छापे टाकले, असे जर्मनीच्या गृहखात्याने सांगितले.

इस्लामिक सेंटर हॅम्बुर्ग किंवा आयझेडएच ही संघटना जर्मनीच्या देशांतर्गत गुप्तचर संस्थेच्या निरीक्षणाखाली आहे. इराणच्या सर्वोच्च नेत्याच्या क्रांतिकारक संकल्पनेचा प्रसार करण्यासाठी त्यांचा प्रयत्न असतो. लेबनॉनच्या इराण-समर्थित हिजबुल्लाह अतिरेकी गटाने जर्मनीमध्ये प्रतिबंधित कारवायांना समर्थन दिल्याच्या संशयावरून अधिकाऱ्यांचे बारील लक्ष आहे. हिजबुल्लाह गटाने इस्रायल-लेबनॉन सीमा ओलांडून इस्रायलवर वारंवार गोळीबार केला आहे. गेल्या महिन्यात हमासने गाझा येथून इस्रायलवर हल्ला केल्यापासूनही सुरू झालेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवरही आता जर्मन सरकार दक्ष झाले आहे.

आयझेडएच ही संघटना हॅम्बर्गमध्ये मशीद चालवत आहेत. गृह मंत्रालयाने सांगितले की जर्मन गुप्तचरांच्या पाहणीनुसार आयझेडएच इतर काही मशिदी आणि गटांवर महत्त्वपूर्ण प्रभाव किंवा पूर्ण नियंत्रण ठेवतात तसेच ते ‘स्पष्टपणे सेमेटिक आणि इस्रायलविरोधी वृत्ती’ला चिथावणी देतात. त्यांच्यावर बंदी घातली जाऊ शकते की नाही, हे अधिकारी तपासत आहेत आणि शोधादरम्यान जप्त केलेल्या साहित्याचे मूल्यांकन केले जाईल, असेही गृहमंत्रालयाने सांगितले.

बुधवारचे छापे हॅम्बुर्ग आणि इतर सहा जर्मन राज्यांमध्ये टाकले गेले. त्यात बाडेन-वुर्टेमबर्ग आणि दक्षिणेकडील बव्हेरिया, बर्लिन आणि हेसे, नॉर्थ-राइन वेस्टफेलिया आणि पश्चिम आणि वायव्येकडील लोअर सॅक्सनी यांचा समावेश आहे. आयझेडएचच्या व्यतिरिक्त, त्याच्या उप-संस्था असल्याचा संशय असलेल्या इतर पाच गटांना देखील छाप्यांमध्ये लक्ष्य करण्यात आले.

गृहमंत्री नॅन्सी फेसर यांनी एका निवेदनात म्हटले आहे, आता विशेषतः अशा वेळी जेव्हा अनेक ज्यूंना धोका वाटत आहे, तेव्हा आम्ही कोणताही इस्लामी प्रचार आणि कोणतेही सेमेटिक आणि इस्रायलविरोधी आंदोलन सहन करत नाही. २ नोव्हेंबर रोजी, फॅसरने हमासच्या किंवा त्याच्या समर्थनार्थ क्रियाकलापांवर औपचारिक बंदी लागू केली आणि हल्ल्यानंतर लगेचच चँसलर ओलाफ स्कोल्झ यांनी दिलेल्या प्रतिज्ञाचे पालन करून इस्रायलवर हमासच्या हल्ल्याचा उत्सव साजरा करणाऱ्या समीदौन या गटाला विसर्जित केले.

logo
marathi.freepressjournal.in