हवाई बेटांवरील वणव्यात ५५ ठार

वणव्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत आहे
हवाई बेटांवरील वणव्यात ५५ ठार

वॉशिंग्टन : प्रशांत महासागरात वसलेल्या अमेरिकेच्या हवाई बेटांवरील जंगलात लागलेल्या वणव्यात ५५ जण ठार झाले आहेत.

वणव्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत. दरम्यान, सुमारे १५ हजार पर्यटक हवाई बेटांवरून अमेरिकेच्या मुख्य भूमीवर जाण्यासाठी विमानांतून रवाना झाले आहेत. वणव्याचा सर्वाधिक तडाखा मौई या बेटाला बसला आहे. यंदाचा वणगा गेल्या कित्येक वर्षांतील सर्वाधिक भीषण असल्याचे हवाईचे गव्हर्नर जोश ग्रीन यांनी म्हटले आहे. समुद्रकिनारी वसलेल्या ऐतिहासिक लहैना या शहराचा ८० टक्के भाग वणव्यात नष्ट झाला आहे. बेटावरील ११ हजार रहिवासी अद्याप वीज आणि पाण्याविना आहेत. त्यांच्यापर्यंत वीज आणि पाण्याचा पुरवठा नेणे हे वणव्यादरम्यान जिकिरीचे काम बनले आहे. बेटावर सहा ठिकाणी पीडितांसाठी बचाव शिबिरे उभी करण्यात आली आहेत. अमेरिकी अध्यक्ष जोसेफ बायडेन यांनी ही मोठी नैसर्गिक आपत्ती असल्याची घोषणा केली असून, मदतीसाठी निधी देण्याची तरतूद केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in