चीनमधील भूकंपात ६ जखमी, ४७ घरे कोसळली

जखमींमधील दोघे गंभीर असून अन्य चार जणांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत.
चीनमधील भूकंपात ६ जखमी, ४७ घरे कोसळली
Published on

बीजिंग : चीनमधील पश्चिमेकडील शिनजियांग प्रांतात मंगळवारी पहाटे झालेल्या भूकंपामध्ये ४७ घरे कोसळली, तर सहा जण जखमी झाले, असे तेथील अधिकाऱ्यांनी सांगितले.

या भूकंपाची तीव्रत ७.१ मॅग्निट्यूड इतकी होती. पहाटे २.२ वाजता हा भूकंप झाला. या भागात एकूण ७८ घरांचे नुकसान झाले. त्यात ४७ घरे कोसळली. काही शेतघरे, कच्ची घरेही यात कोसळली.

चीनमधील भूकंप नेटवर्क केंद्राने सांगितले की, पहाटे २.२ वाजता झालेल्या या भूकंपाने अक्सू प्रीफेक्चरमधील मंदारिनमधील वुशी काऊंटी नावाच्या उचतुरपन काऊंटीमध्ये हा भूकंप होता. सरकारी वृत्तवाहिनीनुसार सुमारे २०० बचाव कार्यकर्ते भूकंपाच्या भागात पाठवण्यात आले आहेत. जखमींमधील दोघे गंभीर असून अन्य चार जणांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत.

logo
marathi.freepressjournal.in