कुवैत इमारत आगप्रकरणी ८ जणांना अटक; मृताच्या नातेवाईकांना १२.५० लाख रुपये नुकसान भरपाई

कुवैत येथे इमारती लागलेल्या भीषण आगीप्रकरणी तीन भारतीय, ४ इजिप्तशियन, १ कुवैती नागरिकाला अटक झाली आहे. या आगीत ५० जणांचा मृत्यू झाला होता.
कुवैत इमारत आगप्रकरणी ८ जणांना अटक; मृताच्या नातेवाईकांना १२.५० लाख रुपये नुकसान भरपाई

कुवैत : कुवैत येथे इमारती लागलेल्या भीषण आगीप्रकरणी तीन भारतीय, ४ इजिप्तशियन, १ कुवैती नागरिकाला अटक झाली आहे. या आगीत ५० जणांचा मृत्यू झाला होता.

अटक आरोपींना २ आठवड्यांसाठी पोलीस कोठडीत पाठवले आहे. त्यांच्यावर निष्काळजीपणा व हत्येचा आरोप ठेवला आहे.

कुवैतचे शेख अमीर शेख मेशल अल-अहमद अल-जाबेर अल-सबाह यांनी मृतांच्या नातेवाईकांना १२.५ लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याची घोषणा केली आहे. हे पैसे परदेशी कामगारांच्या दूतावासाला दिले जातील. त्यानंतर ते संबंधित मृत कामगारांच्या नातेवाईकांना दिले जातील.

logo
marathi.freepressjournal.in