पाकिस्तानात १२०० फुटांवर केबल कारमध्ये ८ जण अडकले

अडकलेल्या गुलफराज या व्यक्तीने एका वृत्तवाहिनीला फोन करून सांगितले
पाकिस्तानात १२०० फुटांवर केबल कारमध्ये ८ जण अडकले

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा भागात केबल कारमध्ये काही शिक्षक व विद्यार्थी हवेत अडकले आहेत. त्यांना वाचवण्यासाठी लष्कराच्या हेलिकॉप्टरला पाचारण केले आहे. मात्र, हेलिकॉप्टरमुळे निर्माण होणाऱ्या हवेच्या झोतात दुसरी केबल तुटण्याचा धोका आहे.

आता या प्रवाशांना वाचवण्याचे काम एसएसजी कमांडोंना देण्यात आले आहे. खैबर पख्तूनख्वा भागात टेकड्यांवर राहणारी मुले शाळेत जायला रोज या केबल कारचा उपयोग करतात. १२०० फूट उंचीवर एक केबल तुटली. यात अडकलेल्या गुलफराज या व्यक्तीने एका वृत्तवाहिनीला फोन करून सांगितले की, आम्ही पाच तास हवेत अडकलो आहोत. एक माणूस बेशुद्ध पडला आहे. ही घटना सकाळी ७ वाजता घडली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in