८२ टक्के लोकांना डिजीटल जाहिराती आवडत नाहीत ; हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यूचा अहवाल

८२ टक्के लोकांना डिजीटल जाहिराती आवडत नाहीत ; हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यूचा अहवाल
Published on

छापील शब्दावर सर्वसामान्य माणसाचा अजूनही विश्वास आहे. वर्तमानपत्रात छापल्या जाणाऱ्या जाहिराती ८२ टक्के जणांनी जगभरात विश्वासार्ह मानल्या आहेत. अमेरिकेतील हार्वर्ड बिझनेस रिव्हूने सादर केलेल्या आपल्या अहवालात हे नमूद केले आहे.

या अहवालानुसार, ग्राहक हे सोशल मीडियावरील जाहिरातींपेक्षा वर्तमानपत्र, टीव्ही, रेडिओवर जास्त विश्वास ठेवतात. यात सर्वाधिक विश्वास वर्तमानपत्रावर आहे. ८२ टक्के लोकांनी वर्तमानपत्रावर विश्वास दाखवला आहे. गेले दशक हे डिजीटल मार्केटिंग तंत्रज्ञानाचे होते. इंटरनेटवरून १०० टक्के विक्री करणाऱ्या कंपन्या येत्या १२ महिन्यात आपला जाहिरातीचा वाढीव खर्च ११.७ टक्क्याने वर्तमानपत्र, टीव्ही-रेडिओवर करणार आहेत.

डिजीटल जाहिराती पसंत नाहीत

व्हीडिओच्या जाहिराती ५७ टक्के लोकांना आवडत नाहीत. तर ४३ टक्के लोकांनी या जाहिराती पाहत नसल्याचे सांगितले. इंटरनेटवर कोणताही मजकूर क्लिक केल्यास लगेच डिजीटल जाहिरात येते. त्यामुळे ब्रँडप्रती नकारात्मक भावना निर्माण होते.

ब्रँडच्या विश्वासर्हतेसाठी वर्तमानपत्र पुढे

जाहिरातीसाठी वर्तमानपत्र सर्वात पुढे आहे. वर्तमानपत्र, टीव्ही व रेडिओवरील जाहिरात ही लक्ष वेधून घेण्यात अधिक चांगली असते.

ऑनलाईन जाहिराती महाग

ऑनलाईन जाहिरातील महागल्या असून परंपरागत मीडियात त्यांचे मूल्य घटले आहे. अर्ध्याहून अधिक ग्राहक हे वर्तमानपत्रातील जाहिराती आवड म्हणून वाचतात. तर डिजीटल जाहिरातींमुळे वापरकर्ते त्रासतात, असे या अहवालात म्हटले आहे.

logo
marathi.freepressjournal.in