
तेल अवीव : एअर स्ट्राईकमुळे गाझात एका रात्रीत ९४ पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला आहे. तसेच ४५ जणांना वैद्यकीय मदतीची अपेक्षा असल्याचे आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले. मात्र, इस्रायलच्या सैन्यदलाने एअर स्ट्राईक केल्याचा कोणताही दावा केलेला नाही. गाझा पट्टीत अन्न पुरवण्यासाठी उभारण्यात आलेल्या फाऊंडेशनजवळ पाच लोकांचा मृत्यू झाला, तर अन्य ठिकाणी मदतीच्या अपेक्षेत रांगेत उभ्या असलेल्या ४० जणांचा या एअर स्ट्राईकमध्ये मृत्यू झाला आहे. बुधवारी रात्री आणि गुरुवारी सकाळी इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात अनेक पॅलेस्टिनी मारले गेले आहेत.
गाझाच्या आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, इस्रायलच्या हल्ल्यात आतापर्यंत गाझा पट्टीतील ५७ हजारपेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला असून २२३ जण अद्याप बेपत्ता आहेत.