आंध्र प्रदेशातील वादळामुळे समुद्रात एक सोन्याचा रथ वाहून आला

आंध्र प्रदेशातील वादळामुळे समुद्रात एक सोन्याचा रथ वाहून आला

देशात सध्या आसनी चक्रीवादळाचा प्रभाव दिसून येत आहे. बंगालच्या उपसागरातून निर्माण झालेले चक्रीवादळ आता आंध्र प्रदेशकडे सरकत आहे. त्यामुळे आंध्रच्या किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस पडत आहे. अशातच आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम भागात वादळामुळे समुद्रात उसळलेल्या लाटांमध्ये एक सोन्याचा रथ वाहून आला आहे. हा रथ कुठून आला याची माहिती अद्याप मिळालेली नाही.

हा सोन्याचा रथ श्रीकाकुलम जिल्ह्यातील सुन्नापल्ली किनाऱ्यावर सापडला आहे. म्यानमार, मलेशिया किंवा थायलंडमधून वाहून हा रथ इथपर्यंत पोहोचल्याचे बोलले जात आहे. “हा रथ दुसऱ्या कोणत्या तरी देशातून आला असावा. आम्ही गुप्तचर आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबद्दल माहिती दिली असून याबाबत अधिक तपास सुरू आहे,” असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

स्थानिक नागरिकांनी दोरीच्या

सहाय्याने रथ बाहेर काढला

या रथाला सोन्याचा थर लावण्यात आला आहे. याचा एक व्हिडीओदेखील सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून या व्हिडीओमध्ये समुद्राच्या लाटांमध्ये हा सोन्याचा रथ तरंगत आहे. स्थानिकांनी या रथाला दोरीने बांधून बाहरे काढले. दरम्यान, आसनी चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाने (एनडीआरएफ) एकूण ५० टीम बाधित भागात तैनात केल्या आहेत. हवामान खात्याने अनेक भागात मुसळधार पाऊस आणि पुराचा इशारा दिला आहे.

महाराष्ट्रातही पडणार पाऊस

आसनी वादळाने दिशा बदलल्याने महाराष्ट्राच्या काही भागातही पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यात मुंबईसह अनेक भागात वातावरण ढगाळ राहील व काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in