अमेरिका-इराकच्या कारवाईत आयसिसचा म्होरक्या खादीजा ठार

ISIS Leader Abu Khadijah Killed : आयसिसचा दुसऱ्या क्रमांकाचा म्होरक्या अब्दुल्ला मक्की मुसलीह अल-रिफाई ऊर्फ अबू खादीजा हा अमेरिकेच्या सेंट्रल कमांड फोर्सेस (सेंटकॉम) आणि इराकी इण्टेलिजन्स अऍण्ड सिक्युरिटी फोर्सेसने केलेल्या संयुक्त कारवाईत ठार झाल्याचे वृत्त आहे.
अमेरिका-इराकच्या कारवाईत आयसिसचा म्होरक्या खादीजा ठार
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

बगदाद : आयसिसचा दुसऱ्या क्रमांकाचा म्होरक्या अब्दुल्ला मक्की मुसलीह अल-रिफाई ऊर्फ अबू खादीजा हा अमेरिकेच्या सेंट्रल कमांड फोर्सेस (सेंटकॉम) आणि इराकी इण्टेलिजन्स अऍण्ड सिक्युरिटी फोर्सेसने केलेल्या संयुक्त कारवाईत ठार झाल्याचे वृत्त आहे. अबू खादीजा हा आयसिसमधील दुसऱ्या क्रमांकाचा म्होरक्या होता आणि जगभरात कारवाया घडवून आणण्याची त्याच्याकडे जबाबदारी होती. खादीजा याच्यासह आयसिसचा आणखी एक दहशतवादी हवाई हल्ल्यात ठार झाल्याची माहिती सेंटकॉमने दिली आहे.

या हवाई हल्ल्यानंतर सेंटकॉम आणि इराकच्या लष्कराने या भागाचा ताबा घेतला आणि डीएनए मॅचिंगच्या माध्यमातून अबू खादीजाची (Abdallah Makki Muslih al-Rifai - Abu Khadijah) ओळख पटवली.

आत्मघातकी जॅकेट

हवाई हल्ल्यानंतर सेंटकॉम आणि इराकी सैन्य घटनास्थळी दाखल झाले तेथे त्यांना दोन्ही मृत आयसिस दहशतवादी आढळून आले. दोन्ही दहशतवाद्यांनी न फुटलेले आत्मघाती जॅकेट घातले होते आणि त्यांच्याकडे अनेक शस्त्रे होती, अशी माहिती देखील अमेरिकन सैन्याने निवेदनात दिली आहे.

logo
marathi.freepressjournal.in