अफगाणिस्तानात पुन्हा एकदा भूकंप झाला आहे. या दुर्घटेत १४ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. तसंच ७८ जणांचा दुखापत झाल्याची देखील माहिती समोर आली आहे.
भूकंपाचे हादरे बसल्याने अफगाणिस्तानमधील लोक भीतीच्या सावटाखाली आहेत. काही दिवसांपूर्वीच अफगाणिस्तानला भूकंपाचे हादरे बसले होते. दरम्यान, भारतात देखील दिल्ली एनसीआरसह उत्तर प्रदेशात भूकंपाचे धक्के बसले होते. यामुळे नागरिकांची एकच धावपळ उडाली होती.
आज अफगाणिस्तानात झालेला भूकंप मोठा असून यात तब्बल १४ लोकांनी आपला जीव गमावला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. एएफपी या न्यूज एजन्सीने अधिकाऱ्यांच्या हवाल्याने याबाबतचं वृत्त दिलं आहे.