बंड फसल्यानंतर वॅग्नर प्रमुख-पुतिन यांची भेट झाली होती

बंडखोर मातृभूमीसाठी लढण्यास तयार
बंड फसल्यानंतर वॅग्नर प्रमुख-पुतिन यांची भेट झाली होती

मॉस्को : खासगी सैन्य वॅग्नरने केलेले बंड फसल्यानंतर वॅग्नर प्रमुख येवगेनी प्रिगोझीन आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची २९ जून रोजी भेट झाली होती, असे वृत्त क्रेमलीनने सोमवारी दिले आहे. पुतीन आणि वॅग्नर कमांडर यांची सुमारे साडेतीन तास बैठक झाली. त्यात पुतीन यांनी वॅग्नरला पर्यायी नोकरीचा प्रस्ताव सादर केला, ज्यात लढ्यावर जाण्याच्या मोहिमांचाही समावेश आहे.

पुतीन सत्तेत आल्यापासून हा गट त्यांच्यासाठी आव्हान होता. आता मात्र ते पुतीन यांचे खंदे समर्थक असल्याचे आश्वासन देत असून, मातृभूमीसाठी लढण्यास तयार असल्याचे सांगत आहेत. वॅग्नरच्या बंडखोरांनी रशियाचे लष्करी नेतृत्व मोडून काढण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान, पुतीन व प्रिगोझीन यांच्या भेटीत पुतीन यांनी बंडखोरीच्या एकंदर घटनेबाबतचे स्पष्टीकरण ऐकून घेतले. बंड फसल्यानंतर अवघ्या दोन आठवड्यांनंतर वॅग्नर गटाचे काय होणार, याबाबत अनिश्चितता होती. बंडखोर आणि त्यांचे प्रमुख यांना बेलारूसला तडीपार करण्याची योजना होती. वॅग्नर गटाला रशियासाठी लढण्याची इच्छा होती. आता हा गट रशियाच्या लष्करासोबत करार करणार आहे. पुतीन यांनी वॅग्नरला पर्यायी नोकरीचा प्रस्ताव सादर केला, ज्यात लढ्यावर जाण्याच्या मोहिमांचाही समावेश आहे. पुतीन सत्तेत आल्यापासून हा गट त्यांच्यासाठी आव्हान होता. आता मात्र ते पुतीन यांचे खंदे समर्थक असल्याचे आश्वासन देत असून, मातृभूमीसाठी लढण्यास तयार असल्याचे सांगत आहेत. दरम्यान, बेलारूसचे नेते अलेक्झांडर ल्युक्शेनको ज्यांनी वॅग्नर आणि पुतीन यांच्यात मध्यस्थी केली होती. त्यांनी प्रिगोझीन अथवा त्यांची माणसे आपल्या देशात नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

logo
marathi.freepressjournal.in