Amazon Layoffs : ॲमेझॉनच्या तब्बल १८०००हुन अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार नारळ

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच ॲमेझॉनच्या कर्मचाऱ्यांना (Amazon Layoffs) जागतिक मंदीचा फटका बसणार
Amazon Layoffs : ॲमेझॉनच्या तब्बल १८०००हुन अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार नारळ

जगातील सर्वात प्रसिद्ध कंपनी असलेल्या 'ॲमेझॉन' (Amazon) या ई-कॉमर्स कंपनीने मोठा निर्णय घेतला आहे. (Amazon Layoffs) नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच ॲमेझॉनच्या कर्मचाऱ्यांना एका वाईट बातमी मिळाली आहे. ॲमेझॉनने १८ हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार आहे. ही माहिती ॲमेझॉन कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अँडी जॅसी यांनी दिली. त्यामुळे अजूनही जागतिक मंदीची दाहकता कमी झालेली नाही. दरम्यान, अगदी काही दिवसांपूर्वीच ॲमेझॉनने जगभरातील तब्बल १० हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले होते. ही ॲमेझॉनमधील सर्वात मोठी कर्मचारी कपात आहे.

कोरोनाकाळामध्ये ॲमेझॉनने मोठ्या प्रमाणात नोकर भरती केली होती. परंतु, कंपनीचा हाच निर्णय आता मोठ्या नुकसानीस कारणीभूत ठरत आहे. यामुळेच नोकरकपात करण्याचा कठोर निर्णय कंपनीला घ्यावा लागत असल्याचे अँडी जॅसी यांनी सांगितले आहे. जर ही नोकर कपात झाली, तर जगातील ई-कॉमर्स क्षेत्रातील ही सर्वात मोठी कॉस्ट कटिंग ठरेल. त्यामुळे आता कंपनीचा अंतिम निर्णय काय असेल? याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे. बलाढ्य कंपन्यांनाही जागतिक मंदीचा फटका बसला आहे. अनेकांना मोठ्या आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागतो आहे.

logo
marathi.freepressjournal.in