कॅनडाच्या भारतावरील आरोपांबद्दल अमेरिका 'खूप चिंतित' अमेरिकी परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन यांचे वक्तव्य

कॅनेडियन तपास पुढे जाणे महत्वाचे आहे आणि भारताने सहकार्य करणे महत्वाचे आहे
कॅनडाच्या भारतावरील आरोपांबद्दल अमेरिका 'खूप चिंतित' अमेरिकी परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन यांचे वक्तव्य

न्यूयॉर्क : कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी कॅनडातील खलिस्तानी फुटीरतावाद्यांच्या हत्येप्रकरणी भारतावर केलेल्या आरोपांबद्दल अमेरिका खूप चिंतित आहे, असे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन यांनी म्हटले आहे.

शनिवारी (अमेरिकेतील शुक्रवारी) न्यूयॉर्क येथे एका पत्रकार परिषदेत बोलताना ब्लिंकेन म्हणाले की, अमेरिकेने या मुद्द्यावर थेट भारत सरकारशी संपर्क साधला आहे आणि तपासात सहकार्य करण्याची सूचना दिली आहे. आम्ही आमच्या कॅनेडियन सहकाऱ्यांशी खूप जवळून सल्लामसलत करत आहोत. फक्त सल्लाच नाही, त्यांच्याशी समन्वय साधत आहोत. आमच्या दृष्टीकोनातून कॅनेडियन तपास पुढे जाणे महत्वाचे आहे आणि भारताने सहकार्य करणे महत्वाचे आहे. आम्हाला आशा आहे की आमचे भारतीय मित्र त्यासाठी सहकार्य करतील. मला वाटते की आंतरराष्ट्रीय व्यवस्थेसाठी हे अधिक महत्त्वाचे आहे.

logo
marathi.freepressjournal.in