उच्च शिक्षणासाठी लंडनमध्ये गेलेल्या भारतीय विद्यार्थीनीचा चाकू हल्ल्यात मृत्यू

ही २७ वर्षीय मृत विद्यार्थीनी भारतातील हैदराबाद येथील रहिवासी आहे
उच्च शिक्षणासाठी लंडनमध्ये गेलेल्या भारतीय विद्यार्थीनीचा चाकू हल्ल्यात मृत्यू

लंडनमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी गेलेल्या एक भारतीय विद्यार्थीनीची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही विद्यार्थीनी भारतातील हैदराबाद येथील रहिवासी असून तेजस्विनी रेड्डी असं या २७ वर्षीय विद्यार्थीनीचं नाव आहे. एका ब्राझिलियन व्यक्तीने तेजस्विनीवर चाकू हल्ला करुन तिला ठार मारल्याचं वृत्त आहे. या हल्ल्यात तिचा जागीच मृत्यू झाला. स्थानिक मेट्रोपॉलिन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यावेळी आणखी एका २८ वर्षीय मुलीवर चाकू हल्ला झाला. या हल्ल्यात तिला किरकोळ जखमा झाल्या असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मृत तेजस्विनीच्या चुलत भाऊ विजय याने दिलेल्या माहितीनुसार तेजस्विनीवर हल्ला करणारा ब्राझिलियन व्यक्ती होता. तो आठवड्याभरापूर्वीच या ठिकाणी रहायला आला होता. तेजस्विनी मागच्या वर्षीच्या मार्च महिन्यापासून लंडनमध्ये मास्टर्सची पदवी घेण्यासाठी आली असल्याचं वृत्त ANIया वृत्त संस्थने दिलं आहे.

logo
marathi.freepressjournal.in