चीनमध्ये पुन्हा भूकंप ५.२ रिश्टर क्षमतेचा धक्का

या भागात तीन दिवसांत बसलेला हा दुसरा भूकंपाचा धक्का आहे
चीनमध्ये पुन्हा भूकंप ५.२ रिश्टर क्षमतेचा धक्का

बीजिंग : चीनच्या वायव्येकडील शिनजियांग उईगुर स्वायत्त प्रदेशातील किरगिझ स्वायत्त प्रांतात ५.२ रिश्टर क्षमतेचा भूकंपाच धक्का बसला. या भागात तीन दिवसांत बसलेला हा दुसरा भूकंपाचा धक्का आहे. हा दुर्गम भाग आहे. चीनच्या भूकंपमापन केंद्राच्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी ६.२१ वा. अहेकी काऊंटीत भूकंपाचा धक्का बसला.

या संबंधात पुढील माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही. शिनजियांग उईगुर स्वायत्त प्रदेशातील अक्सू प्रांतातील वुशी काऊंटी आणि त्याच्या आजूबाजूच्या भागात मंगळवारी ७.१ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्याने तीन जण ठार आणि पाच जण जखमी झाले होते.

logo
marathi.freepressjournal.in