आयसिसविरोधी आघाडीने हमासविरुद्धही लढावे, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचा प्रस्ताव

पश्चिम आशियातील इस्रायल-पॅलेस्टाईन प्रश्न सोडवण्यासाठी नव्याने शांतता प्रक्रिया सुरू करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
आयसिसविरोधी आघाडीने हमासविरुद्धही लढावे, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचा प्रस्ताव

तेल अवीव : सीरियातील इस्लामिक स्टेट (आयसिस) या दहशतवादी संघटनेविरुद्ध स्थापन करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय आघाडीने पॅलेस्टाईनमधील हमासच्या विरोधातही लढावे, असा प्रस्ताव फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी ठेवला आहे. त्यासह पश्चिम आशियातील इस्रायल-पॅलेस्टाईन प्रश्न सोडवण्यासाठी नव्याने शांतता प्रक्रिया सुरू करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

मॅक्रॉन यांनी मंगळवारी इस्रायलला भेट देऊन हमासविरोधी लढाईला पाठिंबा व्यक्त केला. त्यांनी इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतन्याहू यांच्याबरोबर चर्चा केली. सीरिया आणि इराकमधील इस्लामिक स्टेट (आयसिस) या दहशतवादी संघटनेच्या विरोधात २०१४ साली आंतरराष्ट्रीय आघाडीची स्थापना करण्यात आली होती. त्यात ८६ देश आणि जागतिक संघटना सामील झाल्या आहेत. त्यामध्ये युरोपियन युनियन आणि अरब लीग यांचाही समावेश आहे. या आघाडीने गाझा पट्टीतील हमासविरुद्धही लढावे, असा प्रस्ताव मॅक्रॉन यांनी ठेवला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in