पुतिनविरोधक नवाल्नी यांचे निधन

दशकभरापूर्वी पुतिन यांना विरोध केल्याने ते प्रकाशझोतात आले होते. पुतिन यांच्या कथित भ्रष्टाचार आणि अत्याचाराची प्रकरणे त्यांनी जाहीर केली
पुतिनविरोधक नवाल्नी यांचे निधन

मॉस्को : रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे सर्वात प्रबळ विरोधक अलेक्सी नवाल्नी यांचे शुक्रवारी आर्क्टिक प्रदेशातील पोलर वुल्फ येथे तुरुंगात निधन झाले. त्यांना तीन दशकांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली होती.

दशकभरापूर्वी पुतिन यांना विरोध केल्याने ते प्रकाशझोतात आले होते. पुतिन यांच्या कथित भ्रष्टाचार आणि अत्याचाराची प्रकरणे त्यांनी जाहीर केली होती. रशियात होणाऱ्या आगामी निवडणुकीत ते पुतिन यांचे विरोधक मानले जात होते. शुक्रवारी सकाळी तुरुंगात चालत फेरफटका मारून आल्यानंतर ते अचानक कोसळले आणि मरण पावले. त्यांच्या मृत्यूच्या कारणाबद्दल संशय व्यक्त केला जात आहे. पाश्चिमात्य देशांच्या अनेक नेत्यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in