ॲपलचे उत्पादन केंद्र चीनबाहेर नेण्याच्या हालचाली सुरू

ॲपलचे उत्पादन केंद्र चीनबाहेर नेण्याच्या हालचाली सुरू

जगातील मोठी मोबाइल उत्पादक कंपनी ॲपलचे नाव कोणाला माहिती नाही. आपल्या नावीन्यपूर्ण उत्पादनांमुळे आपल्याला हातात ॲपलचा फोन असावा अशी सर्वांचीच इच्छा असते. सध्या ॲपलचे उत्पादन चीनमध्ये होते. चीनमध्ये सध्या कोरोनामुळे अत्यंत कडक निर्बंध लावण्यात आलेले आहेत. त्यामुळे कंपनीचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे कंपनीने आपले उत्पादन केंद्र चीनबाहेर नेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

वॉल स्ट्रीट जर्नल या वर्तमानपत्राच्या एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आले की, ॲपल कंपनीने आपल्या पुरवठा साखळीतील अन्य कंपन्यांना चीनबाहेर जाऊन आपण उत्पादन वाढवू इच्छितो असे सांगितले आहे. ॲपल कंपनी भारत आणि व्हिएटनाम या देशांमध्ये जाऊ शकते, असे वृत्तात म्हटले आहे.

रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामध्ये चीन अप्रत्यक्षपणे रशियाची मदत करताना दिसत आहे. त्यामुळे अनेक पाश्चिमात्य कंपन्या चीनवरील आपले उत्पादनातील अवलंबित्व कमी करू इच्छितात. तसेच त्याचबरोबर चीनमध्ये कोविड-१९ परिस्थिती गंभीर बनली आहे. अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन लावले आहेत. त्यामुळे अनेक कंपन्यांचे उत्पादन ठप्प झाले आहे. त्यामुळे कंपन्यांचे मोठे नुकसान होत आहे. अनेक जहाजे चीनच्या समुद्रात नांगर टाकून उभी आहेत. ॲपलचे ९० टक्के आयफोन, आयपॅड, मॅकबुक लॅपटॉप चीनमध्ये बनवले जातात. यंदाच्या एप्रिलमध्ये ॲपलसमोर मोठे आव्हान निर्माण झाले.

ॲपलचे सीईओ टीम कूक यांनी सांगितले की, आमची आमची पुरवठासाखळी जागतिक स्तरावरील आहे. आमच्या प्रॉडक्ट अनेक ठिकाणी बनवले जातात. आता आम्ही त्याचा विस्तार करण्याचा प्रयत्न करत आहोत.

चीननंतर कंपनी भारताकडे आता मोठ्या आशेने बघत आहे. कारण चीन आणि भारताची लोकसंख्या सर्वसाधारणपणे बरोबरीची आहे. या देशांमध्ये अपलची मोठी क्रेझ आहे.

या प्रकरणाशी संबंधिताने सांगितले की, अपल कंपनी भारतात आपले उत्पादन व व्यापार वाढवण्यासाठी आपल्या काही पुरवठादारांसोबत विचार करत आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in