इस्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यात ६० दिवसांच्या युद्धविरामाला मान्यता

इस्रायलच्या मंत्रिमंडळाने इस्रायल आणि लेबनॉनमधील हिजबुल्लाह यांच्यातील ६० दिवसांच्या युद्धविराम कराराला मंजुरी दिली आहे. मंगळवारी रात्री उशिरा यासंदर्भात मंत्रिमंडळाची बैठक झाली. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी यापूर्वीच युद्धविराम योजनेला मंजुरी दिली आहे.
इस्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यात ६० दिवसांच्या युद्धविरामाला मान्यता
Published on

तेल अवीव : इस्रायलच्या मंत्रिमंडळाने इस्रायल आणि लेबनॉनमधील हिजबुल्लाह यांच्यातील ६० दिवसांच्या युद्धविराम कराराला मंजुरी दिली आहे. मंगळवारी रात्री उशिरा यासंदर्भात मंत्रिमंडळाची बैठक झाली. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी यापूर्वीच युद्धविराम योजनेला मंजुरी दिली आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी या निर्णयाला 'चांगली बातमी' म्हटले आहे. ते म्हणाले की, त्यांनी नेतन्याहू आणि लेबनॉनचे पंतप्रधान नजीब मिकाती यांच्याशी युद्धबंदीसाठी चर्चा केली. दोन्ही देशांमधील युद्ध बुधवारी पहाटे चार वाजता (भारतीय वेळेनुसार बुधवारी सकाळी ७.३० वाजता) थांबेल. बायडेन म्हणाले की, युद्धविराम म्हणजे युद्ध कायमचे संपवणे. ते म्हणाले की, इस्रायली सैन्य ताब्यात घेतलेला भाग लेबनीज सैन्याच्या ताब्यात देईल आणि तेथून माघार घेईल, जेणेकरून हिजबुल्लाने तेथे ताबा मिळवू नये. ही प्रक्रिया ६० दिवसांत पूर्ण होईल.

logo
marathi.freepressjournal.in