व्हिएन्ना : गाझा व लेबनॉनच्या विरोधात लढणाऱ्या इस्रायलला आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याविरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले आहे. मानवतेच्या विरोधात गुन्हा व युद्ध गुन्ह्यांसाठी पंतप्रधान नेतन्याहू व इस्रायलचे संरक्षण मंत्री योआव गॅलंट व ‘हमास’चा लष्करी प्रमुख मोहम्मद डैफ यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले जात आहे, असे न्यायालयाने सांगितले. गाझात इस्रायलकडून सुरू असलेल्या हल्ल्याच्या विरोधातील ही कायदेशीर कारवाई आहे. ‘हमास’ला संपवण्याच्या नावाखाली इस्रायली सैन्य निर्दोष नागरिकांची कत्तल करत आहे. दरम्यान, इस्रायली हल्ल्यात आतापर्यंत ४४ हजार गाझावासीयांचा मृत्यू झाला आहे.