जगभरातील 'एक्स'सेवा ठप्प होताच नेटकऱ्यांकडून भन्नाट मीम्सचा पाऊस

एलॉन मस्क यांनी ट्विटरचा(आताचे एक्स) ताबा घेतल्यापासून अनेक वेळा ते डाऊन झाल्याचे समोर आले आहे. यापूर्वीही अनेकदा अनेक कारणांवरुन एक्स डाऊन झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, काही तास सर्वर डाऊन राहिल्यानंतर आता एक्स सेवा पूर्ववत झाली आहे.

जगभरातील 'एक्स'सेवा ठप्प होताच नेटकऱ्यांकडून भन्नाट मीम्सचा पाऊस

प्रसिद्ध सोशल मीडिया अ‍ॅप एक्स (पूर्वीचे ट्विटर) सेवा जगभरात ठप्प झाल्याचे पाहायला मिळाले. जगभरातील वापरकर्त्यांना एक्स वापरण्यात अडचणी येत होत्या. अचानक एक्स डाऊन झाल्याने नेटकरी हैराण झाले होते. आज (२१ डिसेंबर) पहाटेच्या सुमारास जागतिक स्तरावरील वापरकर्त्यांना एक्सवर पोस्ट करण्यात अडचणी येऊ लागल्या. एलॉन मस्क यांनी ट्विटरचा (आताचे एक्स) ताबा घेतल्यापासून अनेक वेळा ते डाऊन झाल्याचे समोर आले आहे. यापूर्वीही अनेकदा अनेक कारणांवरुन एक्स डाऊन झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, काही तास सर्वर डाऊन राहिल्यानंतर आता एक्स सेवा पूर्वरत झाली आहे.

एक्स सेवा जगभर ठप्प होण्यामागे कोणते कारण होते, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. एक्स डाऊन झाल्यापासून यूजर्स सतत ते पूर्ववत झाले का ते तपासून पाहत होते. तसेच नेटकरी फेसबुकवर जाऊन याबाबत राग व्यक्त करत होते. एक्स ठप्प झाल्यावर आणि आता पूर्वरत सुरु झाल्यावर विविध मीम्स करण्यात आले आहेत. नेटकऱ्यांनी अतिशय मजेशीर मीम्स शेअर केले आहेत.

एका युजरने "ट्विटर डाऊन होण्याचे कारण", असे म्हणत मजेशीर मीम शेअर केले आहे. एका वापरकर्त्याने तर, "ट्विटर डाऊन झाल्याच्या गुन्हात इमरान खान यांच्यावर अजून एक FIR", असे म्हणत त्यांचा सही करतानाचा फोटो शेअर केला आहे. एका युजरने एलॉन मस्क यांचा एक फोटो शेअर केला असून त्याने त्याला "एलॉन मस्क ट्विटर पूर्ववत करताना", असे कॅप्शन दिले आहे.

दरम्यान, गुरुवारी सकाळपासून एक्स वापरकर्त्यांना एक्सवर पोस्ट करण्यात, पोस्ट बघण्यात आणि शेअर करण्यात अडचणी येऊ लागल्या होत्या. एलॉन मस्क यांनी एक्सचा ताबा घेतल्यानंतर त्यांनी त्यात अनेक बदल केलेत. सर्वात महत्वाचा बदल म्हणजे त्यांनी ट्विटरचे नाव बदलून 'एक्स' केले. तसेच ट्विटरचा लोगो देखील बदलून 'एक्स' केला. याच बरोबर मस्क यांनी 'ब्लू टिक' वापरण्यासाठी सक्रिप्शन मॉडेल आणले असून ज्यात पैसे मोजून युजर्स ब्लू टिक मिळवू शकतात. तसेच मस्क यांनी एक्सवर लिहण्याची शब्दमर्यादा देखील वाढवली आहे. याआधी एक्सवर लिहण्यासाठी १४० शब्दांची मर्यादा होती. मस्क यांनी ती मर्यादा वाढवली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in