Bangladesh train accident: बांगलादेशात दोन ट्रेन एकमेकांना धडकल्या ; 20 जणांचा मृत्यू तर शेकडो प्रवासी जखमी

बांगलादेशची राजधानी ढाका जवळील कृष्णगंडज जिल्ह्यातील ही घटना आहे.
Bangladesh train accident: बांगलादेशात दोन ट्रेन एकमेकांना धडकल्या ; 20 जणांचा मृत्यू तर शेकडो प्रवासी जखमी
Published on

बांगलादेशात रेल्वेचा मोठा अपघात झाल्याची घटना घडली आहे. दोन रेल्वे एकमेकांना धडकल्याने ही दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत २० नागरिकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर शेकडो प्रवासी यात गंभीररित्या जखमी झाले आहेत. बांगलादेशची राजधानी ढाका जवळील कृष्णगंडज जिल्ह्यातील ही घटना आहे. या अपघाता मृतांची संख्या वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे. ढाका ट्रिब्यूनने यासंदर्भातील माहिती दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अनेकजण रेल्वे कोचच्या खाली अडकले आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं असून युद्धपातळीवर मदतकार्य सुरु आहे. आज दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. यात २० जण मृत्यूमुखी पडल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे या मार्गावरील रेल्वे सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. हा अपघात नेमका कोणत्या कारणाने झाला, याबाबतची माहिती अद्याप मिळू शकली नाही.

logo
marathi.freepressjournal.in