ढाक्यात इमारतीला भीषण आग; होरपळून ४६ ठार, २२ जखमी

बांगलादेशची राजधानी ढाका येथील बेली रोड भागातील ग्रीन कॉझी कॉटेज या सात मजली इमारतीला गुरुवारी रात्री लागलेल्या भीषण आगीत ४६ जणांचा मृत्यू झाला
ढाक्यात इमारतीला भीषण आग; होरपळून ४६ ठार, २२ जखमी
Published on

ढाका : बांगलादेशची राजधानी ढाका येथील बेली रोड भागातील ग्रीन कॉझी कॉटेज या सात मजली इमारतीला गुरुवारी रात्री लागलेल्या भीषण आगीत ४६ जणांचा मृत्यू झाला असून २२ जण जखमी झाले आहेत. या आगीत अनेक रेस्टॉरंट्स व दुकानेही जळून खाक झाली.

या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील ‘कच्ची भाई’ नावाच्या लोकप्रिय रेस्टॉरंटमध्ये गुरुवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास आग लागली. त्यानंतर ती अन्य मजल्यांवर पसरली.

आरोग्य मंत्री डॉ. सामंत लाल सेन यांनी पहाटे २ च्या सुमारास सांगितले की, ३३ मृतदेह ढाका मेडिकल कॉलेज रुग्णालयात आणि १० शेख हसीना नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बर्न आणि प्लास्टिक सर्जरीमध्ये आणण्यात आले, तर आणखी एका पीडितेचा पोलीस रुग्णालयात मृत्यू झाला. जखमींची प्रकृती चिंताजनक आहे.

शुक्रवारी सकाळी ढाका मेडिकल आयसीयूच्या अतिदक्षता विभागात उपचारादरम्यान आणखी एकाचा मृत्यू झाला.

logo
marathi.freepressjournal.in