बांगलादेशात हिंदू तरुणाची गोळ्या घालून हत्या

गेल्या काही महिन्यांपासून बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारात वाढ होताना दिसत आहे. जेस्सोर जिल्ह्यातील मोनिरामपूर येथे सोमवारी दुपारी राणा प्रताप बैरागी या हिंदू तरुणाची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून हत्या केली. तीन आठवड्यांत बांगलादेशात हिंदूवरील हल्ल्याची ही पाचवी घटना आहे.
बांगलादेशात हिंदू तरुणाची गोळ्या घालून हत्या
बांगलादेशात हिंदू तरुणाची गोळ्या घालून हत्याPhoto : X
Published on

ढाका : गेल्या काही महिन्यांपासून बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारात वाढ होताना दिसत आहे. जेस्सोर जिल्ह्यातील मोनिरामपूर येथे सोमवारी दुपारी राणा प्रताप बैरागी या हिंदू तरुणाची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून हत्या केली. तीन आठवड्यांत बांगलादेशात हिंदूवरील हल्ल्याची ही पाचवी घटना आहे.

बांगलादेशात मध्यावधी निवडणूक जवळ आलेली असतानाच तेथे हिंदूंवरील हिंसाचारात वाढ होताना दिसत आहे. राणा प्रताप बैरागी हा तरुण बाजारात बसलेला होता. त्यावेळी अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळीबार केला. राणाला अनेक गोळ्या लागल्या. त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन राणा प्रताप याचा मृतदेह ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. हल्लेखोरांची ओळख व हत्येच्या कारणांचा शोध घेतला जात आहे.

दरम्यान, बांगलादेशात एका ४४ वर्षीय हिंदू विधवेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. आरोपींनी बलात्कारानंतर तिला झाडावर लटकवून मारहाण केली. ही घटना बांगलादेशातील झेनाइदह जिल्ह्यातील कालीगंज येथे झाली. पोलिसांनी याप्रकरणी एका आरोपीला अटक केली.

logo
marathi.freepressjournal.in