बांगलादेशचे भारतातील उच्चायुक्तांना तातडीने मायदेशी परतण्याचे आदेश

भारत आणि बांगलादेश यांच्यातील राजनैतिक संबंध सध्या एका नाजूक वळणावर आले असून बांगलादेश सरकारने भारतातील आपले उच्चायुक्त रियाझ हमिदुल्लाह यांना तातडीने मायदेशी परतण्याचे आदेश दिले. या 'अर्जंट कॉल'मुळे दोन्ही देशांमधील राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.
बांगलादेशचे भारतातील उच्चायुक्तांना तातडीने मायदेशी परतण्याचे आदेश
Photo : X
Published on

ढाका : भारत आणि बांगलादेश यांच्यातील राजनैतिक संबंध सध्या एका नाजूक वळणावर आले असून बांगलादेश सरकारने भारतातील आपले उच्चायुक्त रियाझ हमिदुल्लाह यांना तातडीने मायदेशी परतण्याचे आदेश दिले. या 'अर्जंट कॉल'मुळे दोन्ही देशांमधील राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाने रियाझ हमिदुल्लाह यांना कोणतीही पूर्वसूचना न देता तातडीने ढाका येथे पाचारण केले. हे आदेश इतके तातडीचे होते की, हमिदुल्लाह यांना अवघ्या काही तासांतच दिल्ली सोडावी लागली. ते सोमवारी रात्रीच ढाका येथे पोहोचले आहेत. सामान्यतः जेव्हा एखाद्या देशाच्या दूताला 'अर्जंट' बोलावले जाते, तेव्हा त्याचा अर्थ काहीतरी मोठा धोरणात्मक निर्णय किंवा निषेध व्यक्त करणे असा असतो. हमिदुल्लाह यांना परत बोलावणे, हा भारतासाठी एक 'राजनैतिक संदेश' दिला जात असल्याचे मानले जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in