वॉशिंग्टन : अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार म्हणून कमला हॅरिस यांना माजी अध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल ओबामा यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. डेमोक्रॅटिक पक्षातील बहुतांश नेत्यांनी हॅरिस यांना पाठिंबा दिला आहे. यापूर्वी ओबामा दाम्पत्याने हॅरिस यांच्या उमेदवारीला विरोध दर्शविला होता.
बराक आणि मिशेल ओबामा यांनी शुक्रवारी एक व्हिडीओ संदेश जारी केला आणि हॅरिस यांना पाठिंबा दर्शविला. हॅरिस यांनीही ओबामा दाम्पत्याचे समाजमाध्यमावर पोस्ट टाकून आभार मानले आहेत. ओबामा दाम्पत्याने पाठिंबा दिल्याने हॅरिस यांना अधिक बळ प्राप्त झाले असून उमेदवारी जवळपास निश्चित असल्याचे मानले जात आहे.