Bhutan Flood : भूतानमध्ये हिमनदी सरोवर फुटले; महापुरामुळे भारताला खबरदारीचा इशारा

भूतानमधील सिंटाफू सरोवरातून हिमनदी सरोवराचा उद्रेक होऊन आलेल्या पुरामुळे गासा जिल्ह्यातील प्रसिद्ध गासा त्साचू उष्ण पाण्याच्या झऱ्यांचा संपूर्ण परिसर वाहून गेला आहे.
Bhutan Flood : भूतानमध्ये हिमनदी सरोवर फुटले; महापुरामुळे भारताला खबरदारीचा इशारा
Bhutan Flood : भूतानमध्ये हिमनदी सरोवर फुटले; महापुरामुळे भारताला खबरदारीचा इशारा (Photo-X/@WMO)
Published on: 

गासा (भूतान) : भूतानमधील सिंटाफू सरोवरातून हिमनदी सरोवराचा उद्रेक होऊन आलेल्या पुरामुळे गासा जिल्ह्यातील प्रसिद्ध गासा त्साचू उष्ण पाण्याच्या झऱ्यांचा संपूर्ण परिसर वाहून गेला आहे. तसेच पुनाखा-गासा महामार्गाचा काही भागही उद्ध्वस्त झाला आहे. या महापुरामुळे भारताला खबरदारीचा इशारा दिला आहे. सरोवरातील पाण्याच्या विसर्गानंतर आलेल्या पुरामुळे गासा जिल्ह्यातील मो छू नदीच्या काठावर असलेला प्रसिद्ध गासा त्साचू उष्ण पाण्याच्या झऱ्यांचा संपूर्ण परिसर वाहून गेला आहे.

पुनाखा-गासा दुय्यम राष्ट्रीय महामार्गावरील ३१.८५ किमी अंतरावरील रस्त्याचा एक भाग पूर्णपणे वाहून गेला आहे. हा मार्ग वाहतुकीसाठी बंद केला आहे. गासा जिल्ह्यातील लुंगो परिसरातील लाया गेओगमधील वाकिला पर्वताजवळ असलेल्या सिंटाफू सरोवरातून गुरुवारी, संध्याकाळी पाण्याचा विसर्ग झाल्याची घटना घडली.

विशेष पूर सूचना जारी

दरम्यान, या पुराच्या वृत्तानंतर शेजारील भारतातही खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे. विशेषतः उत्तर बंगालमधील संकोश नदी आणि तिच्या उपनद्यांच्या काठावर राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. दरम्यान, केंद्रीय जल आयोगाने (सीडब्ल्यूसी) पश्चिम बंगाल आणि आसामसाठी विशेष पूर सूचना जारी केली आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)