व्हिएतनाम भेटीत बायडेन यांचा व्यावसायिक करारांवर भर ;जॉन मॅककेन स्मारकात आदरांजली वाहिली

व्हिएतनाम युद्धादरम्यान त्यांनी प्रदीर्घ तुरुंगवास भोगला होता
व्हिएतनाम भेटीत बायडेन यांचा व्यावसायिक करारांवर भर ;जॉन मॅककेन स्मारकात आदरांजली वाहिली

हनोई : नवी दिल्लीतील जी-२० शिखर बैठक आटोपून अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी सोमवारी व्हिएतनामचा दौरा केला. दोन्ही देशांमधील नवीन व्यावसायिक करार आणि भागीदारी यावर त्यांचा भर होता.

व्हिएतनाम एअरलाइन्स ही कंपनी अमेरिकेच्या बोईंग कंपनीकडून ५० प्रवासी विमाने खरेदी करणार आहे. हा करार ७.५ अब्ज डॉलर्सचा आहे. अमेरिकेच्या अ’रिझोना राज्यातील अमकोर टेक्नॉलॉजी ही कंपनी व्हिएतनामच्या तंत्रज्ञान क्षेत्रात १.६ अब्ज डॉलर्सची गुंवणूक करणार आहे. या करारांना बायडेन यांच्या भेटीत अंतिम स्वरूप देण्यात आले.

बायडेन यांची व्हिएतनामला दिलेली ही पहिलीच भेट होती. बायडेन यांनी व्हिएतनामचे पंतप्रधान फाम मिन्ह चिन्ह यांची भेट घेतली. बायडेन यांनी व्हिएतनामच्या सेमीकंडक्टर उद्योगाला बळकटी देण्याबद्दल आणि प्रशांत महासागरात खुली सागरी वाहतूक सुरू ठेवण्याबाबत चर्चा केली. त्यांचे दिवंगत मित्र आणि सहकारी सेन जॉन मॅककेन यांच्या स्मृतीस्थळावर आदरांजली अर्पण केली. व्हिएतनाम युद्धादरम्यान त्यांनी प्रदीर्घ तुरुंगवास भोगला होता.

logo
marathi.freepressjournal.in