बायडेन येणार, पण कोरोना बंधने पाळून…!

व्हाइट हाऊसच्या प्रवक्त्याने जाहीर केले
बायडेन येणार, पण कोरोना बंधने पाळून…!

वॉशिंग्टन : नवी दिल्लीत ९ आणि १० सप्टेंबर रोजी होणाऱ्या जी-२० संघटनेच्या शिखर परिषदेसाठी अमेरिकेचे अध्यक्ष जोसेफ बायडेन येणार असल्याचे नक्की झाले आहे. मात्र, त्यांच्या पत्नी आणि अमेरिकेच्या फर्स्ट लेडी जिल बायडेन यांना कोरोनाची लागण झाल्याने जो बायडेन हेदेखील कोरोनाविषयक बंधने पाळणार आहेत, असे व्हाइट हाऊसच्या प्रवक्त्याने जाहीर केले.

जो बायडेन यांचा भारत आणि तेथून पुढे व्हिएतनामचा दौरा निश्चित झालेला असतानाच जिल यांना कोरोनाची लागण झाली. त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणे दिसत आहेत. त्यामुळे जो बायडेन यांच्या भारतभेटीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र, चाचणीनंतर जो बायडेन यांना कोरोना झाला नसल्याचे निष्पन्न झाले. तरीही खबरदारीची उपाययोजना म्हणून भारतभेटीत जो बायडेन कोरोनासंबंधी सर्व बंधनांचे पालन करणार आहेत.

logo
marathi.freepressjournal.in