बायडेन यांच्या सुरक्षेत चूक ;ताफ्यातील वाहनाला कारची धडक

अमेरिकी सीक्रेट सर्व्हिसचे प्रवक्ते स्टीव्ह कोपेक यांनी सांगितले की, घटनेनंतर बायडेन यांचा ताफा तेथून नेहमीप्रमाणे निघून गेला
बायडेन यांच्या सुरक्षेत चूक ;ताफ्यातील वाहनाला कारची धडक
PM

वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष जोसेफ बायडेन यांच्या ताफ्यातील वाहनाला एका कारने धडक दिली. घटनेवेळी ही कार थांबलेली असल्याने फारसे नुकसान झाले नाही. बायडेन आणि त्यांच्या पत्नी जिल बायडेन या दोघांनाही कसलीही इजा झाली नाही. 

बायडेन त्यांची पत्नी जिल यांच्यासह सोमवारी (अमेरिकेतील रविवारी) डेलावेअर राज्यातील वल्मिंग्टन येथे निवडणूक प्रचारासाठी गेले होते. अमेरिकेत पुढील वर्षी अध्यक्षीय निवडणुका होत आहेत. प्रचार कार्यालयातील कामकाज आटोपून बाहेर पडताना अचानक झालेल्या मोठ्या आवाजाने बायडेन थबकले. बायडेन यांच्या ताफ्याचे संरक्षण करण्यासाठी तैनात केलेल्या एका थांबलेल्या कारवर दुसरी एक कार येऊन धडकली. सुरक्षा रक्षकांनी ताबडतोब त्या कारला घेराव घालून चालकाला पकडले. त्यानंतर बायडेन त्यांच्या कारमध्ये जाऊन बसले आणि पत्नीसह तेथून निघून गेले.

अमेरिकी सीक्रेट सर्व्हिसचे प्रवक्ते स्टीव्ह कोपेक यांनी सांगितले की, घटनेनंतर बायडेन यांचा ताफा तेथून नेहमीप्रमाणे निघून गेला. या घटनेची तपास विल्मिंग्टनचे स्थानिक पोलीस करत आहेत. याचा अर्थ धडकलेल्या कारच्या चालकाकडून अध्यक्षांसाठी गंभीर धोका नव्हता, असे मानले जात होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in