Pakistan Bomb Blast : पाकिस्तान पेशावर येथील मशिदीत बॉम्बस्फोट, 28 जणांचा मृत्यू झाला असून 150 जण जखमी ; आकडा वाढण्याची शक्यता

नमाज पढत असताना हल्लेखोराने बॉम्बने स्वत:ला उडवले. या हल्ल्यातील मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता
Pakistan Bomb Blast : पाकिस्तान पेशावर येथील मशिदीत बॉम्बस्फोट, 28 जणांचा मृत्यू झाला असून 150 जण जखमी ; आकडा वाढण्याची शक्यता

पाकिस्तानातील पेशावर येथील मशिदीत बॉम्बस्फोट झाला. येथील पोलीस वसाहतीतील एका मशिदीत भाविक नमाज पठण करत असताना अचानक बॉम्बस्फोट झाल्याची माहिती आहे. या बॉम्बस्फोटात 28 जणांचा मृत्यू झाला असून 150 जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस आणि तपास यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या असून तपास सुरू आहे. अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. मात्र या बॉम्बस्फोटात खूप नुकसान झाले आहे.

स्थानिक मीडिया रिपोर्टनुसार, बॉम्बस्फोटानंतर मशिदीचे छत कोसळले आहे. नमाज पढत असताना हल्लेखोराने बॉम्बने स्वत:ला उडवले. या हल्ल्यातील मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. बॉम्बस्फोटामुळे मशिदीचा मोठा भाग कोसळला आहे, असे वृत्त आहे. त्यामुळे अनेक भाविक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. स्फोटानंतर पोलीस आणि स्थानिक प्रशासनाची टीम घटनास्थळी पोहोचली आहे. मशिदीमध्ये सध्या बचावकार्य सुरू आहे. त्याशिवाय जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. वृत्तानुसार मृतांमध्ये दोन पोलिसांचाही समावेश आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in