ब्रासीलिया : ब्राझीलमध्ये विमान कोसळून झालेल्या भीषण अपघातात ६२ जणांचा मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना साओ पाऊलो शहराजवळ घडली. या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
स्थानिक विमान कंपनी ‘वोईपास’चे एटीआर ७२ हे टर्बोप्रॉप जातीच्या विमानाने कास्कावेल वरून साओ पाऊलोकडे निघाले होते. हे विमान अनियंत्रित झाले. हे विमान एका मिनीटात १७ हजार फूट खाली आले. साओ पाऊलोकडून ८० किमीवर विनहेडो शहराजवळ हे विमान कोसळले. विमानात ५८ प्रवासी व ४ कर्मचारी होते.