
सात नवजात शिशुंची हत्या केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या महिलेला न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे. ही महिला ब्रिटेनमध्ये नर्स म्हणून काम करत होती. त्यावेळी तिने नुकत्याच जन्मलेल्या सात बाळांची हत्या केली होती, तर सहा बालकांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला होती. याप्रकरणी तिला मँचेस्टरच्या क्राउन कोर्टाने सोमवारी दोषी ठरवत आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
लुसी (Lucy Letby)असं या ३३ वर्षीय कृर महिलेचं नाव आहे. तीची क्रूतरता लक्षात घेता न्यायालयाने तिला कोणताही जामीन देण्यास नकार देत ही शिक्षा सुनावली. यावेळी कोर्टाने म्हटलं की, महिलेला आपल्या कृत्याबात काहीही पश्चाताप नसून तिने आपला गुन्हा नाकारलेला नाही. त्यामुळे या महिलेच्या शिक्षेत सुट देण्याचा कोणताही प्रश्न उद्धभवत नाही.
या नर्सच्या घरात विविध प्रकारच्या नोट्स आढळल्या होत्या. यातील बहुतांश नोट्समध्ये 'मी सैतान आहे.' असं लिहलेलं आढळून आलं होतं. कोर्टाने लुसीला याआधीच दोषी ठरवलं होतं. सोमवारी तिला शिक्षा सुनावण्यात आली.
या नर्सने काही बाळांना इन्सुलिनचं इंजेक्शन देऊन मारलं. तर काहींना अधिक प्रमाणात दुध पाजून त्यांची हत्या केली. तिने एकून सात बाळांचा असा जीव घेतला. तर इतर सहा बाळांची हत्या केल्याचा प्रयत्न केला असल्याचं मँटेस्टर क्राऊन कोर्टात सांगण्यात आलं.
२०१५-१६ सालीचं हे प्रकरण असून यावेली लुसीने एका वर्षात १८ नवजात शिशुंचा जीव घेण्याचा प्रयत्न केला होता. काउंटीज ऑफ जेस्टर रुग्णलयात काम करताना सुली बाळांचे मृत्यू नैसर्गिकरित्या होत असल्याचं दाखवण्याच प्रयत्न करत असल्याचं वकिलांनी सांगितली.